अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न



अकलूज (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर २ व मुली नंबर ३ या शाळेत राखी निर्मिती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.रक्षाबंधन निमीत्त शाळेतील मुला-मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा.राखी तयार करण्याचे ज्ञान आवगत व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
           हिंदु संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सणाचे खूप महत्त्व आहे.भाऊ बहिणीच्या नात्यात खूप ओढ असते म्हणूनच भाऊ बहिणीचे नाते खूप गोड आहे अशाच भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी व मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून शाळेमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये मुले व मुली उत्साहाने सहभागी झाले होते.
             या कार्यशाळेसाठी माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी महेश गवळी, विस्ताराधिकारी सौ.भक्ती नाचणे व केंद्राचे केंद्रप्रमुख सुरज कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेमध्ये मुले नंबर दोन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले,श्रीमती मनिषा बळवंतराव,तय्यब शेख,दत्तात्रय गायकवाड,श्रीमती अंजली अडाणे,श्रीमती फातिमा मुलाणी, श्रीकांत राऊत,श्रीमती हजराबी बांगी तसेच मुली तीन नंबर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे,श्रीमती ललितागौरी राणे,श्रीमती सुरय्या कोरबू, श्रीमती रेखा कोळी,पांडुरंग मोहिते,श्रीमती वर्षाराणी जाधव, समीर कोरबू,श्रीमती करीना शेख या सर्वांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages