सहकार महर्षि साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पतसंस्थेचे सेवानिवृत्त जेष्ठ सभासद भगवान गणपत खटके यांचे शुभहस्ते करणेत येऊन, अहवाल सालात मयत झालेल्या सभासदांचा दुखवटा ठराव व्हाईस चेअरमन पांडूरंग इनामदार यांनी मांडला त्यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरिल १ ते ६ विषयांचे व अहवाल वाचन सेक्रेटरी अभिजीत माने-देशमुख यांनी केले व त्यास उपस्थित कामगार सभासदांनी सर्वानुमते मंजूरी दिली.
आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये कारखान्याच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी सभासदांचा पाणीजार, शाल, श्रीफळ व गुलाबाचे रोप देणेत येऊन सत्कार करणेत आला तसेच ज्या सभासदांनी संस्थेच्या किराणा विभागातून वीस हजारापेक्षा जादा रक्कमेचा किराणा खरेदी केलेला आहे त्या सभासदांना बकेट मोप भेट स्वरुपात कारखान्याच्या संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते देणेत आले.
सभेचे अध्यक्ष व चेअरमन युवराज इनामदार यांनी पतसंस्थेचे कामकाजाचा सविस्तर आढावा सांगून सभासदांना १० टक्के लाभांश जाहिर केला. त्यानंतर कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व पतसंस्थेचे कामकाज अतिशय चांगला पध्दतीने चालू असून, चालू व भविष्यातील साखर उद्योगाचा आढावा घेतला. त्याचबरोबर सर्व अधिकारी व कामगार बंधूनी बदलत्या परिस्थितीनुसार सहकार्याने कामकाज करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कारखाना कामगार पसंस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेस कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, नागेश राजमाने व कामगार युनियन प्रतिनिधी तसेच पतसंस्थेचे आजी व माजी संचालक उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन पतसंस्थेचे संचालक, गणेश लोकरे यांनी केले तर आभार संचालक अशोक डोके यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment