टीबीमुक्त भारतासाठी सोलापूरात जनजागृती; स्वयंसेवकांना प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

टीबीमुक्त भारतासाठी सोलापूरात जनजागृती; स्वयंसेवकांना प्रशिक्षण

 टीबीमुक्त भारतासाठी सोलापूरात जनजागृती; स्वयंसेवकांना प्रशिक्षण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत शहर ‌क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सोलापूर शहरात जनजागृती मोहीम सुरू आहे.त्याअनुषंगाने दयानंद महाविद्यालय कला आणि विज्ञान येथे एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांना क्षयरोग तपासणी, उपचार, प्रतिबंध आणि जनजागृतीचे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये स्वयंसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सार्वजनिक ठिकाणी रॅली पोस्टर प्रदर्शन, पथनाट्यद्वारे सामाजिक प्रबोधन करणे, सोशल मीडियाचा वापर करून टीबी जनजागृतीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे, आयुष्यमान आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणे, टीबी आजाराविषयी समज गैरसमज आणि क्षयरोगाविषयक शंका निरसनासाठी TB MUKT BHARAT अँपच्या वापराचे फायदे,निक्षय मित्र,निक्षय पोषण योजनेत प्रथिनेयुक्त आहाराचे महत्त्व इत्यादी बाबत संवेदीकरण करण्यात आले यासाठी प्रमुख मार्गदर्शन सोलापूर महानगरपालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ.प्रसाद कुमार यांनी केले.
क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून लवकर निदान आणि त्वरित उपचार घेतल्यास यावर प्रभावीपणे मात करता येते याबरोबरच लोकसहभागामूळे टीबी मुक्त भारत संकल्पनेला बळकटीकरण आणि गती मिळेल असे प्रतिपादन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती.वीणा पवार, आरोग्याधिकारी डॉ.राखी माने यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी युनिटचे व्हनमाने यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीमती. भाग्यश्री अगरखेड यांनी केले यावेळी शहर पीपीएम समन्वयक निरज लांडगे, एसटीएस रूपेश गायकवाड,टीबीएचव्ही रविंद्र कदम इत्यादी एनटीईपी कर्मचारी, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages