एसटी पतसंस्थेच्या सचिवपदी उमाकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

एसटी पतसंस्थेच्या सचिवपदी उमाकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड

एसटी पतसंस्थेच्या सचिवपदी उमाकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड
कळंब आगारात स्वातंत्र्यदिनी प्रशासन व संघटनेच्या वतीने सत्कार



कळंब, (कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था लि., छत्रपती संभाजीनगरच्या सचिवपदी कळंब येथील वाहक उमाकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल कळंब बस आगारात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राप प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आगारप्रमुख विजयकुमार घोलप यांच्या हस्ते उमाकांत गायकवाड यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर कळंब आगारातील संघटनेच्या वतीनेही त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी कळंब आगारातील वाहक उमाकांत गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आल्याने आगारातील कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा पतसंस्थेच्या कामकाजाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास अशोक पाटील, महेश थोरबोले, वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी, एस. व्ही. सारूक, स्थानक प्रमुख बालाजी मुळे, कार्यशाळा अधीक्षक श्री. कवडे, गणपत जाधव, रामलिंग जाधवर, विलास जाधव, प्रभाकर झांबरे, अनिल बांगर , विश्वनाथ माळी , बळीराम कवडे , शिवाजी बांगर यांच्यासह यांत्रिक विभागातील कर्मचारी, वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages