अविनाश गोडसे यांची बदली रद्द करा
मराठा सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश दत्तात्रय गोडसे यांची बदली रद्द करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तसेच वरिष्ठ पातळीवर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजि. प्रा. डॉ. जी. के. देशमुख यांच्या स्वाक्षरीने २४ ऑगस्ट २०२६ रोजी हे निवेदन देण्यात आले. गोडसे हे बदलीस पात्र नसतानाही केवळ ते मराठा समाजाचे असल्याने इतर कर्मचाऱ्याने त्यांच्यावर दबाव आणून, त्यांची सेवा ज्येष्ठता लक्षात न घेता जाणीवपूर्वक बदली करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ही बदली अन्यायकारक असून सदरची बदली तातडीने रद्द करून गोडसे यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. बदली रद्द न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, मराठा सेवा संघ शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील,
संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, लिंबराज जाधव, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, संतोष माने, जीवन यादव, मल्लिकार्जुन, शेखर भोसले, दास तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment