श्रीकृष्ण पतसंस्था ग्राहकांना डिजिटल सेवा देणार : प्रा. आवताडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

श्रीकृष्ण पतसंस्था ग्राहकांना डिजिटल सेवा देणार : प्रा. आवताडे

श्रीकृष्ण पतसंस्था ग्राहकांना डिजिटल सेवा देणार : प्रा. आवताडे

कुरुल (कटूसत्य वृत्त) : ज्याची पत नाही, त्याला पतपुरवठा करून त्याची पत निर्माण करण्याचे काम श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेने केले आहे. पारदर्शकता आणि विश्वासाच्या बळावर अल्पावधीतच संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला असून, येत्या १ सप्टेंबरपासून ग्राहकांना सर्व डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रा. प्रमोद आवताडे यांनी दिली.
कामती बु. येथील श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रा. प्रमोद आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
प्रा. आवताडे म्हणाले की, संस्थेने अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीत सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेकडे सध्या २१ कोटी रुपयांच्या ठेवी असून, १३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच आर्थिक वर्षात संस्थेने ५१ कोटी रुपयांची उलाढाल केली असून, संस्थेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे.
सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष हनुमंत निकम, अॅड. अर्जुनराव पाटील, माजी सभापती जालिंदर लांडे, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, सज्जनराव पाटील, रंगसिद्ध दसाडे, माजी अभियंता संभाजी गरड, शशिकांत पाटील, शुक्राचार्य हावळे, बाबासाहेब जाधव, अशोक आवताडे यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील वसंत पाटील, श्रीनिवास भोसले, संजय पाटील, भैरवनाथ पाटील, संतोष जगताप आदी उपस्थित होते. संस्थेचे सीईओ ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अप्पासाहेब कोळी यांनी केले, तर व्यवस्थापिका मीना भोसले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages