जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा भावांची निर्दोष मुक्तता- ॲड.मिलिंद थोबडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा भावांची निर्दोष मुक्तता- ॲड.मिलिंद थोबडे

 जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा भावांची निर्दोष मुक्तता- ॲड.मिलिंद थोबडे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिनांक तानाजी भागवत धडे वय 47 रा. सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुलाब जालिंदर आवारे वय 38 व बालाजी जालिंदर आवारे वय 42 दोघे राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांना बार्शी येथील जिल्हा न्यायाधीश यु ल जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की दिनांक 20/02/2020 रोजी तानाजी हा त्याच्या घरातील पाण्याच्या नळास पाणी कमी येत असल्याने तो ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन सदरची बाब ग्रामसेवका सांगत असताना गुलाब आवारे हा त्याच्या मोबाईल मध्ये शूटिंग काढत होता.हि बाब तानाजी याचे लक्षात आल्यावर त्यांनी शूटिंग काढू नको असे म्हणाला. त्यावर गुलाब व बालाजी आवरे या दोघांनी तानाजी यास जातीवाचक शिवीगाळ केली व त्यांच्यात भांडणे चालू असताना तानाजी याची पत्नी आली असता तिला देखील दोघांनी जातीवाचक शिवीगाळ केली अशा अशा आशयाची फिर्याद तानाजी याने वैराग पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते सरकारतर्फे एकंदर सहा साक्षीदार तपासण्यात आले

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲड. मिलिंद थोबाडे यांनी आपले युक्तिवादत फिर्यादी व आरोपी यांचेत पूर्वीचा वाद असल्याचे साक्षीदारानी उलट तपासात मान्य केले असून गुन्ह्यातील मुख्य घटक हे सरकार पक्षाने शाबीत केले नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. निखिल पाटील यांनी तर सरकारतर्फे ॲड. डीडी देशमुख यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages