नेताजी प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा रॅली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

नेताजी प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा रॅली

 नेताजी प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा रॅली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा   रॅली करण्यात आली. प्रशालेतील स्काऊट गाईड पथकातील ३४० विद्यार्थ्यांनी नीलम नगर, म्हेत्रे नगर, माळी वस्ती, जमादार वस्ती, अंबिका नगर आणि इंगळे वस्ती या परिसरातून रॅली काढले. रॅलीत विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम्, तिरंगा आमची शान भारत देश महान, घराघरात तिरंगा मनामनात देशभक्ती, हुतात्म्यांच्या बलिदानाला—शतशः नमन, तिरंग्याचा मान राखू—भारताचा गौरव वाढवू आदी विविध प्रकारचे देशभक्तीपर घोषणा दिल्या. घोषणांनी परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे सांस्कृतिक प्रमुख शिवानंद पुजारी यांनी तिरंगा ध्वजाची रचना, महत्त्व व आचारसंहितेचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.रॅलीत प्राचार्य रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, स्काऊट प्रमुख अशोक पाटील, रेवणसिद्ध दसले, विश्वाराध्य मठपती, बसवराज तेग्गेळी, गणपती पाटील, शीतल पाटील, गाईडचे प्रमुख विजयालक्ष्मी माळवदकर ,जयश्री बिराजदार, मीनाक्षी वांगीकर आदींनी सहभाग घेतले.

*चौकट* 
 *देशभक्तीची भावना* 
 'हर घर तिरंगा' अभियानाचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर वाढवणे आणि राष्ट्रध्वजाशी असलेले आपले नाते अधिक वैयक्तिक व जिव्हाळ्याचे बनवणे आदी उद्दिष्टे असल्याचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages