आदिवासी पारधी समाजातील लोकांचे SIR मतदार नोंदणी तात्काळ करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या संपूर्ण भारतात SIR मतदान नोंदणी सर्वत्र सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात,शहरात,तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा,BLO हे राबवीत असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.परंतु सोलापूर जिल्ह्यात व शहरात आदिवासी पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांचे मतदार SIR मतदार यादीचे विशेष पुन निरीक्षण नोंद कारवाई होत नसलेबाबत संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी पारधी समाजातील लोक माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांना संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून व्यथा मांडल्या होत्या त्याची दखल घेत आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेय यांनाही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर जिल्हा SIR प्रमुख उपजिल्हाधिकारी महसूल विभागाचे लक्ष्मण कसेकर यांना बोलावून घेऊन सदर SIR मतदार नोंदणी साठी तात्काळ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, प्रांत अधिकारी,BLO यांना व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) द्वारे महत्त्वाच्या सूचना दिल्या असून सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील प्रत्येक तालुक्यात, शहरात, वाडी वस्तीवर SRI प्रणाली द्वारे मतदान नोंदणी करून घेण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज SIR मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही असे खुद्द जिल्हाधिकारी कार्तिकेय व सोलापूर जिल्हा SIR प्रमुख उपजिल्हाधिकारी महसूल विभागाचे लक्ष्मण कसेकर यांनी सांगितले आहे. निवेदन देताना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण,भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश सचिव नकुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे आदी उपस्थित राहून आदिवासी पारधी समाजाच्या SIR मतदान नोंदणीच्या व्यथा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मांडल्या होत्या त्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment