सस्टेनेबिलिटी इन लिव्हिंग स्पेसवर प्रमोद चौगुले यांचे प्रेझेंटेशन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

सस्टेनेबिलिटी इन लिव्हिंग स्पेसवर प्रमोद चौगुले यांचे प्रेझेंटेशन

सस्टेनेबिलिटी इन लिव्हिंग स्पेसवर प्रमोद चौगुले यांचे प्रेझेंटेशन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बांधकामासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या विषयावर असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूर व अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने हॉटेल फर्न येथे सस्टेंनीबिलिटी इन लिविंग स्पेस या विषयावरती सांगलीचे प्रसिद्ध बांधकाम शास्त्रज्ञ प्रमोद चौगुले यांनी आपले प्रेझेंटेशन दिले.

या कार्यक्रमास अल्ट्राटेक सिमेंटचे झोनल अधिकारी इंजिनिअर अतुल गोड घाटे यांच्यासह असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूर अध्यक्ष बी. एम जाधव उपाध्यक्ष वैभव होमकर सचिव संतोषकुमार बायस, खजिनदार मनोज महेंद्रकर तसेच इंजि. इफ्त्येकार नदाफ हे आवर्जून उपस्थित होते.

 यावेळी प्रेझेंटेशन देताना चौगुले म्हणाले की समाजासाठी धरती मातेने दिलेल्या शाश्वत ऊर्जेचा वापर करून, लिविंग स्पेसमध्ये जास्तीत जास्त चांगला उपयोग व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत, यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष इंजि. भगवान जाधव यांनी केले तर आभार सचिन संतोषकुमार बायस यांनी मानले.

सोलापुरातील सर्व इंजिनिअर्सना उपयुक्त असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमास असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अल्ट्राटेकचे घोडघोटेसर, दीपक किंगार, चव्हाण, राजेश कांबळे. तसेच अल्ट्राटेकची  सर्व टीम हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages