मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे- खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे- खा. प्रणिती शिंदे

 मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे- खा. प्रणिती शिंदे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी आणि शिवनगी या गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेची पाहणी करून मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

गावभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी बीएलओ (BLO) आणि मतदारांशी संवाद साधत विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती घेतली. मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा पाया असून प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून मतदार यादीतील आपले नाव कायम ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे हेच जनप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याचे नमूद केले. जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी ताकद असून गावागावांच्या शाश्वत विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आसबेवाडी येथे ग्रामस्थांनी पाणीटंचाई, तलावाचे खोलीकरण, नवीन बोअरवेल किंवा विहीर, मालिकराया मंदिराजवळ नवीन डीपी, सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत वीजपुरवठा, म्हैसाळ योजनेचे पाणी पाझर तलावात सोडणे, खरीप विमा २०२५ची रक्कम तसेच आसबेवाडी-सलगर-लवंगी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागण्या मांडल्या.

यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी तलावाचे खोलीकरण सीएसआर निधीतून करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध करून तलावाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

आसबेवाडी-सलगर-लवंगी रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत, पुढील तीन दिवसांत काम सुरू झाले नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असा इशारा दिला. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक पाईप तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages