राजराजेश्वरी शाळेतील २३२ विद्यार्थ्यांनी दिली सिद्धेश्वर वनविहाराला भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 17, 2026

राजराजेश्वरी शाळेतील २३२ विद्यार्थ्यांनी दिली सिद्धेश्वर वनविहाराला भेट

 राजराजेश्वरी शाळेतील २३२ विद्यार्थ्यांनी  दिली सिद्धेश्वर वनविहाराला भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेतील २३२ विद्यार्थ्यांनी विजापूर रोडवरील हिंचगेरी मठासमोरील सिद्धेश्वर वनविहाराला भेट देऊन विविध वृक्षांची व त्यांच्या उपयोगासंबधी माहिती मिळविले.
मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील २३२ विद्यार्थ्यांनी व पाच शिक्षकांनी सिद्धेश्वर वनविहारला भेट दिले. यावेळी उद्यानाचे प्रमुख शिवराज चिवडशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना वनविहारासंबंधी तसेच चाळीसहून अधिक रोपांचे वृक्षांचे नावे व माहिती सांगितले.प्रत्येक वृक्ष मनुष्यासाठी वरदान आहे.प्रत्येक झाड मनुष्याला ऑक्सीजन,फळे, फुले, पाने, औषधी वनस्पती, सावली, पशू पक्ष्यांसाठी निवारा, लाकूड आदीसह अनेक गोष्टी देतो.वड,बांबू, सुबाभूळ, बहावा आणि जांभूळ यांसारख्या नैसर्गिक झाडांची व विविध फळ झाडे तसेच आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची माहिती सांगितले. वनविहारातील भिंतीवरील विविध प्राणी व पक्ष्यांची चित्रे पाहिले तसेच वनविहारात फेरफटका मारताना विविध पक्षी व त्यांचे घरटे पाहिले. लहान सहान प्राण्यांना पाहून विद्यार्थी खूप आनंदीत झाले. त्यानंतर नेहरूनगर येथील पाणी तपासणी कार्यालयाला भेट देऊन पाणी प्रयोगशाळा दाखविण्यात आले. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि बोअरवेलच्या पाण्याची तपासण्याची पद्धत सांगण्यात आले. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक परीक्षण कशी केली जाते.पिण्याचे पाण्यातील पिएच व टिडिएस, कडकपणा,जड धातू आणि जिवाणूंची तपासणी तसेच आरोग्यासाठी उत्तम पाणी कशी ओळखावे यासंबंधी विस्तृत माहिती सांगण्यात आले. शेवटी रेवणसिद्धेश्वर मंदिर या प्राचीन धार्मिक पर्यटन स्थळाला भेट देण्यात आले. क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी प्रमुख विशाल खाडे, हणमंत कुरे, वैशाली गुजर, श्रेयस बिराजदार, नागेश कंळत्रे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages