करमाळा तालुक्यातील महिलांसाठी २,००० शिलाई मशीनचे वाटप; नोंदणीचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

करमाळा तालुक्यातील महिलांसाठी २,००० शिलाई मशीनचे वाटप; नोंदणीचे आवाहन

 करमाळा तालुक्यातील महिलांसाठी २,००० शिलाई मशीनचे वाटप; नोंदणीचे आवाहन




करमाळा (कटूसत्य वृत्त):- सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पद्मजाताई इंगवले यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील महिलांसाठी २,००० शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पद्मजाताई इंगवले यांनी आतापर्यंत करमाळा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत विधवा, एकल तसेच अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांना हळदी-कुंकू समारंभात मानाचे स्थान देण्याबरोबरच उजनी परिसरातील मच्छीमार महिलांना मासेमारीसाठी आवश्यक साहित्य शासनाकडून उपलब्ध व्हावे यासाठीही त्यांनी पाठपुरावा केला आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने यापूर्वीही त्यांनी हजारो महिलांना सवलतीच्या दरात शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून आता करमाळा तालुक्यातील २,००० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. २,००० महिलांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र लाभार्थींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येईल. कार्यक्रमाची तारीख, वेळ व ठिकाण याबाबतची माहिती पुढील काळात प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे पद्मजाताई इंगवले यांनी सांगितले.

ज्या महिलांना शिलाई मशीन किंवा पिको-फॉल मशीनची आवश्यकता आहे, त्यांनी ७८२२८५८१६४, ९६८९७९९३६७, ९३७३८७७४२५, ८८८८७२८९४१, ९५७९९३४२७६ किंवा ९०४९७२०८५७ या संपर्क क्रमांकांवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असून, कार्यक्रमाच्या दिवशी किंवा त्यानंतर विनानोंदणी मशीनचे वाटप करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages