पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा- आ. समाधान आवताडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा- आ. समाधान आवताडे

 पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा- आ. समाधान आवताडे





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित वीज समस्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. 
यावेळी मतदारसंघातील वीजविषयक प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत आमदार आवताडे यांनी मंगळवेढा येथे महावितरणचे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे, पंढरपूर येथे महापारेषणचे नवीन विभागीय कार्यालय मंजूर करणे, नागरिकांना किमान आठ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देणे तसेच अपूर्ण सबस्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. गादेगाव सबस्टेशनचे अर्धवट स्थिती असलेलं काम तात्काळ पूर्ण करावे, वटवटे येथील सबस्टेशनच्या जागेची अडचणी सोडवून तत्काळ या कामास सुरुवात करावी, शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना सुरळीत वीज मिळण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करावेत या हि सूचना मांडल्या.

यावर ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आवश्यक सबस्टेशनची कामे पूर्ण करण्यासह सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांमुळे नागरिक, शेतकरी व उद्योगधंद्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याची सूचना आमदार समाधान आवताडे यांनी केली.

बैठकीस महावितरणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, अधीक्षक अभियंता प्रांजल कांबळे, सहसचिव सूर्यकांत निकम, एस. एस. दराडे, नितीन काळे, प्रवीणसिंह परदेशी, सुनील माने यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages