विद्यार्थ्यांच्या यशासाठी गुरुचे कार्य दिशादर्शक- मल्लिनाथ कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गुरुमुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात, त्यामुळे नैतिक मूल्ये बळकट होतात, जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, यशात देखील गुरुंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सर्व शाखांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुस्थानी असलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सिद्रामप्पा पाटील,दिगंबर जगताप उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देखील गुरुंबद्दल आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना भविष्यात सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मल्लिनाथ मसुती म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिक्षकांपुढे मोठे आवाहन उभे आहेत, त्यावर मात करण्यासाठी शिक्षकांनी अवांतर वाचन, चिंतन व मनन करून सक्षमतेने विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री स्वामी समर्थ व कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले. सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले आभार निशिगंधा सोमेश्वर यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गुरुवंदना
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गुरुवंदना दिली, यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, प्रा राजशेखर पवार, डॉ बाळासाहेब पाटील, डॉ शितल झिंगाडे, प्रा सौरभ भस्मे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment