नातेपुते येथील एस.एन.डी.इंटरनॅशनल स्कूलची बारामती एआय सेंटर व रोबोटिक्स लॅबला भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

नातेपुते येथील एस.एन.डी.इंटरनॅशनल स्कूलची बारामती एआय सेंटर व रोबोटिक्स लॅबला भेट

नातेपुते येथील एस.एन.डी.इंटरनॅशनल स्कूलची बारामती एआय सेंटर व रोबोटिक्स लॅबला भेट



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने नातेपुते येथील एस.एन.डी स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एन.डी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स  सेंटर व रोबोटिक्स लॅबला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली.यावेळी ए.आय.सेंटरचे मनोज शेलार यांनी डेटा सायन्स आणि डेटा अँनालिटिक्स, क्वामटम एआय, एआय आणि व्हर्च्यूअल रिअँलिटी, संगणक दुष्ठी, उच्चप्रक्रिया संगणक, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, उष्मायन केंद्र या तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणक यंत्रामध्ये माणसाप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे तंत्रज्ञान असल्याचे मनोज शेलार यांनी सांगितले. प्राची काळे यांनी रोबोटिक लॅब या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देत असताना सांगितले की, रोबोटिक लॅब ही एक अशी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे यामध्ये ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रावर संशोधन विकास आणि शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये कोडिंग, क्रिटिकल थिंकिंग, (चिकित्सक विचार) आणि समस्येचे निवारण करण्याची क्षमता या रोबोटिक लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढवली जात असल्याचे प्राची काळे यांनी सांगितले. यावेळी एस एन डी स्कूलचे मुख्याध्यापक संदीप पानसरे, पीआरओ मनोज राऊत तसेच दादासाहेब ढोपे, सारिका पालवे वर्षा गुळीक, पल्लवी जगताप व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकासह विद्यार्थ्यांनी रोबोटिक लॅब व एआय सेंटरची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच या सेंटरचे मनोज शेलार व रोबोटिक लॅबच्या प्राची काळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिल्याबद्दल मुख्याध्यापक संदीप पानसरे यांनी त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages