सोलापूर शहरात १५ ठिकाणी ‘स्वच्छतेचा संदेश’ पथनाट्य प्रयोग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ निमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्वच्छतेचा संदेश’ या पथनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. तुतारी, संबळ, आणि दवंडीच्या गजरात स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम ७, ८ आणि ९ जुलै २०२६ या कालावधीत शहरातील १५ ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
७ जुलै २०२६ (सायंकाळ सत्र)
- छत्रपती शिवाजी महाराज चौक (वेलनेस मेडिकल शेजारी) – सायं. ४.०० वा.
- मेकॅनिक चौक – सायं. ४.४५ वा.
- नवी पेठ (अण्णा इडली गृहसमोर) – सायं. ५.३० वा.
- पार्क चौपाटी – सायं. ६.१५ वा.
- डी-मार्ट, जुने सोलापूर – सायं. ७.०० वा.
८ जुलै २०२६ (सायंकाळ सत्र)
- बेडर पूल – सायं. ४.०० वा.
- लक्ष्मी मार्केट – सायं. ४.४५ वा.
- वेस्टरलाईज, दमाणी नगर – सायं. ५.३० वा.
- मनपा आवार – सायं. ६.१५ वा.
- कणा चौक – सायं. ७.०० वा.
९ जुलै २०२६ (सकाळ सत्र)
- होम मैदान – सकाळी ७.०० वा.
- सोलापूर रेल्वे स्टेशन – सकाळी ७.४५ वा.
- सोलापूर बस स्थानक – सकाळी ८.३० वा.
- पार्क स्टेडियम – सकाळी ९.१५ वा.
- सात रस्ता – सकाळी १०.१५ वा.
या पथनाट्याच्या माध्यमातून कचरा कचरापेटीत टाकणे, घंटागाडीत ओला-सुका-सॅनीटरी-विशेष काळजीयोग्य कचरा अश्या चार पद्धतीने वर्गीकरण करून देणे, कचऱ्याचे RRR (Reduce-Reuse-Recycle) पद्धतीने पुनर्वापर करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच ‘स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर’ या संकल्पाला बळकटी देण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिकेने शहरातील सर्व नागरिकांना कुटुंबीय, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांसह या लोकनाट्याचा लाभ घेऊन स्वच्छ, निरोगी आणि सुंदर सोलापूर घडविण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे.
या जनजागृती उपक्रमासाठी महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे, मा. स्थायी समिती सभापती श्रीमती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहर अध्यक्षा श्रीमती रोहिणी तळवळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच सफाई अधीक्षक (वाहन) वासुदेव नडीमेटला यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
.png)
No comments:
Post a Comment