आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून महापालिकेला दोन घंटागाड्या प्रदान
सदर घंटागाड्यांच्या लोकार्पण समारंभास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, विधी समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक राजेश्री दोडमणी, किरण पवार सफाई अधीक्षक अनिल चाराटे तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या दोन घंटागाड्यांमुळे सोलापूर शहरातील घरगुती कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापनाची गुणवत्ता वाढून शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ शहर निर्मितीसाठी नागरिकांनीही कचरा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
.png)
No comments:
Post a Comment