मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना: मोहोळ तालुका अध्यक्षपदी अजिंक्यराणा पाटील
राज्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून, मोहोळ तालुक्यातील सहअध्यक्षपदी अजिंक्यराणा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. महायुतीतील विविध घटक पक्षांकडून या पदासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे सुपुत्र आणि युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवत त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
अजिंक्यराणा पाटील यांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी तसेच लोकनेते शुगरचे चेअरमन व भाजपचे युवा नेते बाळराजे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे म्हणाले की, "अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नेतृत्वातून आणि कल्पक नियोजनातून मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना अधिक दर्जेदार व सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास आहे."
.png)
No comments:
Post a Comment