रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या प्रांतपालपदी जयेश पटेल यांचा रविवारी पदग्रहण सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२च्या २०२६-२७ वर्षासाठी नवनिर्वाचित प्रांतपाल जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा रविवार दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पद्मावती कन्व्हेन्शन हॉल, एमआयडीसी, अक्कलकोट रोड येथे होणार असल्याची माहिती मितेश पंचमीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास आचार्य परमपूज्य गोस्वामी १०८ श्री आश्रयकुमारजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर रो. के. पी. नागेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मावळते प्रांतपाल रो. सुधीर लातूरे हे प्रांतपालपदाची सूत्रे रो. जयेश आर. पटेल यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरला ९० वर्षांची परंपरा असून, या क्लबमधून आठव्यांदा प्रांतपाल होण्याचा मान मिळत आहे. डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत ११ महसुली जिल्ह्यांतील १०४ रोटरी क्लब, ४,२०० हून अधिक रोटेरियन्स आणि ३६ रोटरॅक्ट क्लब कार्यरत आहेत.
यंदाच्या वर्षात "FLY 3132 – Together We Fly", "Create Lasting Impact" आणि "लौकिक ते अलौकिक" या संकल्पनांवर आधारित सेवा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रथम महिला रो. पारुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली 'रोटरी आदिशक्ती' हा महिलांच्या सक्षमीकरणाचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
तसेच 'प्रत्येक क्लब – एक शाळा' या उपक्रमांतर्गत २०० हून अधिक डिजिटल क्लासरूम, ओजस अभियान, नेत्र व दंत आरोग्य तपासणी, अॅनिमिया व थॅलेसेमिया जनजागृती, जलसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण भागात रोटरी कम्युनिटी कॉर्प्स (RCC), कृषी अवजारे बँक आणि युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे जयेश पटेल यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस पार्थ दावडा, सलाम शेख, राजन वोरा, संजीव मेंते, अतुल चव्हाण, डॉ. केदार कहाते, सुहास लाहोटी, सुनील माहेश्वरी, धनश्री केळकर, संतोष कणेकर, पराग कुलकर्णी, शिवाजी उपरे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment