अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीचा विस्तार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीचा विस्तार (दि. १० जुलै २०२६) राज्याध्यक्ष इल्हाजोद्दिन फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कार्यक्रमास सिटीझन उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मजहर शाहपुरे, रचभरे उर्दू शाळेचे मुल्ला, संघटनेचे विभागीय सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष अ. गफूर अरब तसेच जिल्हा सचिव माजिद कलादगी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी संघटनेच्या भावी वाटचालीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
*नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :*
- *जावीद चांदा – विभागीय उपाध्यक्ष*
- *फैयाज अहमद अब्दुल मजीद सगरी – जिल्हा सचिव*
- *मोहम्मद शोएब मोहम्मद शफी नाईक – जिल्हा उपाध्यक्ष*
- *बिलाल मोहम्मद युनूस शेख – शहर कार्याध्यक्ष*
- *अन्वर अब्दुल रशीद शेख – शहर सहसचिव*
यावेळी संघटनेच्या बळकटीसाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:
Post a Comment