शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

 शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन





अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता १०वी, १२वी व सीईटी परीक्षेतील एकूण १२४ गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी स्मृतीभवन शंकरनगर येथे सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. सदरचे सत्कार संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
           महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने गौरवलेल्या शिक्षण प्रसारक मंडळातील ३३ शाखेतील  मार्च  २०२६ मधील इयत्ता १०वीचा निकाल ९१.७७ टक्के लागला. १०वी मध्ये९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ५४ व शाखावर प्रथम आलेल्या २० अशा एकूण ७४ गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार होत आहे.
       तर १२वीच्या परीक्षेत संस्थेच्या ७ शाखेतून ९१.९५ टक्के निकाल लागला. १२ वीच्या ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ३३ विद्यार्थ्यांचा, १०० गुण प्राप्त केलेल्या १, व्यवसाय  विभागातील २, शाखावर प्रथम आलेले १० असे १२ वीचे एकूण ४५ गुणवंत विद्यार्थी, तर रत्नाई सीईटी मार्गदर्शन केंद्रातील ९५ टक्के पर्संनटाईन पेक्षा अधिक  ५ अशा इयत्ता १०वी व १२वी मिळून १२४ विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
               इयत्ता १०वी परीक्षेत कु. सृष्टी दोशी हिने ९९.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम तर कु. संस्कृती कोरेकर ९७.४० टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला.कु.समृध्दी बाबर हिने ९७ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.
     तर १२ वीत अरबाज बागवान याने ९३.८३ टक्के  मिळवित संस्थेत प्रथम तर कु. अपूर्वा राऊत यांनी ९१.८३ टक्के मिळवित द्वितीय व कु. आफरीन मोकाशी हिने ९१.५० टक्के मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.या वेळी सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages