अकलूज येथे पालखी मार्गावर अतिक्रमणांचा सुळसुळाट; वाहतुकीची समस्या वाढली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

अकलूज येथे पालखी मार्गावर अतिक्रमणांचा सुळसुळाट; वाहतुकीची समस्या वाढली

अकलूज येथे पालखी मार्गावर अतिक्रमणांचा सुळसुळाट; वाहतुकीची समस्या वाढली



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज शहरातील गांधी चौक ते जूने बसस्थानक हा रस्ता अत्यंत  वर्दळीचा आहे, या रस्त्याच्या कडेला किरकोळ व्यावसायिकांनी केलेल्या, अतिक्रमणामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होतेच,परंतु याच मार्गावरून वेगवेगळ्या संतांची पालखी,तसेच याच मार्गावरून,जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वैष्णव मोठ्या संख्येने येत असतात. तरी अकलूज नगरपरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून त्वरित अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
           पूर्वी तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत असताना, ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून,अकलूज परिसरातील सरकारी जागेत, रस्त्याच्या कडेला, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले होते. अतिक्रमण काढल्यामुळे, अकलूजच्या खऱ्या सौंदर्याचे विहंगम विस्तीर्ण असे रूप दिसून आले होते. परंतु कालांतराने हे सौंदर्य जास्त दिवस टिकले नाही. या सौंदर्यावर काही स्वार्थी आणि कुप्रवृत्तीच्या मानसिकतेने, पान टपऱ्या, वडापाव गाडे, भेळीचे गाडे, कपडे विक्री दुकाने, चहा गाडे असे किरकोळ व्यावसाय टाकून, पुन्हा अकलूजच्या सौंदर्यावर पुन्हा अतिक्रमणाचा घाला घातला.एवढेच नाही तर अकलूज तलाठी कार्यालयाच्या आवारात,वाहनाची प्रचंड कोंडी होत असताना, तेथेही रस्त्यावर काही लोकांनी नुकतीच दुकानदारी थाटली आहे. तर काही लोकांनी भाडेतत्वावरही टपऱ्या दिल्या आहेत. असे असताना संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी शांत  का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. याकडेही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काही दिवसांवर आला आहे. या दिवशी अकलूज मध्ये प्रचंड गर्दी असते, सुदैवाने सदरचे अतिक्रमण अपघाताला कारणीभूत ठरू नये, कारण काही अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी, टाकलेल्या टपर्यांसमोर मुरूमाचे कट्टे केले आहेत. यामुळे वहाने रस्त्यावर उभी केली जातात.रस्त्यावर वहाने उभी केल्यामुळे, रस्ता अपुरा पडतो आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते.अशावेळी गंभीर अपघात होऊ  शकतो?यापूर्वी याच रस्त्यावर गंभीर अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे समजते. म्हणून पुढील अनर्थ टळावा तर पालखी सोहळ्या अगोदरच संबंधित विभागाने काळजीपूर्वी याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages