सोलापूर एनटीपीसी प्रमुखपदी मोहन व्ही. यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 11, 2026

सोलापूर एनटीपीसी प्रमुखपदी मोहन व्ही. यांची नियुक्ती

 सोलापूर एनटीपीसी प्रमुखपदी मोहन व्ही. यांची नियुक्ती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एनटीपीसी सोलापूरच्या प्रकल्प प्रमुख म्हणून मोहन व्ही. यांनी १० जुलै २०२६ रोजी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे.
मोहन व्ही. यांनी रायपूर येथील 'रविशंकर विश्वविद्यालय' मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यांनी वर्ष १९९० मध्ये 'एक्झिक्युटिव्ह ट्रेनी' म्हणून एनटीपीसी मध्ये आपल्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उत्कृष्ट सेवाकाळात त्यांनी एनटीपीसीच्या बाल्को (कोरबा), तालचेर कनिहा, सीपत, सोलापूर आणि खरगोन यांसारख्या विविध प्रमुख व महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.
आपल्या कार्यकाळात त्यांनी परिचालन (Operation) विभागात काम करताना प्लांटची कार्यक्षमता, उत्कृष्टता आणि विश्वसनीयता वाढवण्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे. एनटीपीसी सोलापूरच्या प्रकल्प प्रमुखपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी, त्यांनी एनटीपीसी खरगोन येथे महाव्यवस्थापक (इंधन व्यवस्थापन आणि परिचालन व अनुरक्षण - O&M विभाग) तसेच प्रकल्प प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर महाव्यवस्थापक (परिचालन व अनुरक्षण) शुभाशिस बंदोपाध्याय, अप्पर महाव्यवस्थापक (मानव संसाधन) कन्हैया दास यांच्यासह एनटीपीसी सोलापूरमधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त प्रकल्प प्रमुख मोहन व्ही. यांचे उत्साहात स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages