अविनाश कुलकर्णी स्मृती पुरस्कार पत्रकार रवींद्र देशमुख यांना जाहीर
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते देशमुख यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.
कै. अविनाश कुलकर्णी यांनी अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने पत्रकारिता करत समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडली. पत्रकारितेतील मूल्ये जपत त्यांनी अनेक तरुण पत्रकारांना मार्गदर्शन करून घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पत्रकारितेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एका सहकाऱ्याने
या पुरस्कारासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे.
पुरस्काराचे मानकरी रविंद्र देशमुख हे गेल्या तीन दशकांपासून पत्रकारितेला व्रत मानून कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले असून, पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे आणि खजिनदार किरण बनसोडे यांनी केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment