सुसंस्कृत पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची – गायकवाड
कै. सदाशिवराव मोरे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे एवढेच शिक्षकांचे कर्तव्य नसून, समाजाला दिशा देणारी सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. बदलत्या काळात शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्व अधिक वाढले असून, मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच सक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन पुणे पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी केले.
रविवारी, हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित केलेल्या कै. सदाशिवराव मोरे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे हे होते
यावेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष संजीव खडके, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, उपनिबंधक उमेश पवार, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१) व्ही. व्ही. डोके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते विविध जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावर्षीचा कै. सदाशिवराव मोरे आदर्श शिक्षक पुरस्कार वैशाली कार्वेकर (जि.प. शाळा, शेटे वस्ती, सोलापूर), निर्मला केदार-लिंगे (जि.प. शाळा, जगताप वस्ती, सोलापूर), राहुल राठोड (जि.प. शाळा, बेलाटी, ता. उत्तर सोलापूर), चंद्रकांत पुंडलिक नवले (जि.प. शाळा, वाघोली, ता. मोहोळ) तसेच रमेश गोविंद जाधव (जि.प. शाळा, इंदिरानगर, कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) आणि विजय अच्युत गुंड (जि.प. शाळा, गावडे वस्ती, ता. मोहोळ) यांना प्रदान करण्यात आला.
आपल्या भाषणात श्रीधर गायकवाड म्हणाले की, शिक्षक हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी घटक आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्ये रुजविण्याचे कार्य शिक्षकांनी सातत्याने केले पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात पुरस्कार निवड समितीचे प्रमुख राहुल सुरवसे आणि प्रिया सुरवसे यांनी पुरस्कारांची घोषणा करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
.png)
No comments:
Post a Comment