अकलूज येथील राजकीय कावळ्या कडून पदाचा दुष्प्रयोग?
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील राजकीय कावळ्याने स्वतःचे आयुष्य, आलिशान आणि सुख समृद्धीचे करण्यासाठी अध्यक्ष पदाचा,दुष्प्रयोग, करून पार्टीच्या विश्वासाला तडा लावल्यामुळे, अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, पक्षांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे खात्रीशीर वृत्त सूत्रांकडून समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी पक्षाच्या शहर अध्यक्षाने जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असते. अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना, त्याने संघटन कौशल्य सिद्ध करणे आवश्यक असते.सामाजिक विधायक कार्याला चालना देणे महत्वाचे असते. आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची मते, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत.कार्य आणि कर्तुत्वाचा प्रभाव पडला पाहिजे. संयम,नम्रता, समानता ठेवत कार्यकर्त्याशी दीर्घकालीन नाते तयार झाले पाहिजे. वैचारिक बुद्धिमत्तेचा कस लागला पाहिजे,प्रभावी संवाद, उत्कृष्ट संभाषण, रोजच्या राजकीय घडामोडीचा अभ्यास करणे आवश्यक असते.असा अध्यक्ष मिळालेल्या पदाला न्याय देऊ शकतो, असे काही कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
तर काहीजण म्हणाले आमचा विद्यमान अध्यक्ष यांचा विसावा कथित मवाली आणि गुंड वृत्तीचे महाशय यांच्यात अधिक असतो. सुशिक्षित आणि संस्कारी कार्यकर्ते आमच्या अध्यक्षांना आवडत नाहीत. कथित मटक्यापासून गुटख्यापर्यंत आणि हिरव्या वनस्पती पासून ते भिशी व्याजबट्ट्यापर्यंत अशा विविध कारनाम्यात,त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.आशा कारनाम्यानमुळे काही वर्षांपूर्वी अकलूजच्या खाकी साम्राज्याने, त्यांचा योग्य तो सत्कार करून,त्यांची जंगी मिरवणूक अकलूज परिसरात काढली असल्याचे काही कार्यकर्ते म्हणाले.
अकलूज मधील राजकीय कावळ्याने, पक्षाच्या मलिदावर डल्ला मारत आलिशान वैभव निर्माण केले.आलिशान बंगले, चार चाकी वाहने,वेगवेगळ्या ठिकाणी अमाप मालमत्ता, भिशी, मटका, गुटखा, मेंदू सुन्न करणारी हिरवी वनस्पती आणि महत्वाच व्याजबट्टा असे जर अध्यक्ष नेमले तर पक्षाला,पार्टीला बट्टा लागल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा जनतेत सुरू आहे.
.png)
No comments:
Post a Comment