अकलूजमध्ये महिलांसाठी ८ ऑगस्ट रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिर
यावेळी डॉ. अभिजितराजे भोसले, डॉ. अरुंधती खराडे-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराची माहिती व ठळक वैशिष्ट्ये:
दिनांक:शनिवार, ८ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
ठिकाण: जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज
उपलब्ध तपासण्या व सुविधा:
या शिबिरामध्ये बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल चे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून महिलांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
हेमोग्लोबीन तपासणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निदानासाठी: 'पॅप टेस्ट', 'स्मिअर टेस्ट' आणि 'एचपीव्ही टेस्ट'.
स्तनाच्या कर्करोग निदानासाठी: तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीनंतर गरज भासल्यास मॅमोग्राफी (स्तनाची सोनोोग्राफी) ही मोफत बार्शी कॅन्सर हॉस्पिटल येथे करून दिली जाईल.
सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट (स्तनाचा) कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बऱ्याचदा माहितीचा अभाव आणि उपचाराचा खर्च किंवा भीती पोटी महिला आजाराकडे दुर्लक्ष करतात. आजाराचे वेळीच निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार शक्य असतात. 'प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ' हा संदेश देत तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment