महापालिकेच्या वतीने पालकमंत्री गोरे यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आषाढी वारीचे नियोजन, समन्वय आणि विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी व्यवस्थापनामुळे वारी यशस्वीरीत्या पार पडली. आषाढी वारीच्या यशस्वी नियोजन व व्यवस्थापनाबद्दल" सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महापालिका तसेच इतर सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट समन्वय साधून वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लाखो भाविकांच्या सेवेसाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी अत्यंत सुरळीत व यशस्वी झाली या प्रसंगी स्थायी समिती सभापती सौ. रंजीताताई चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी ताई तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार नगरसेवक अक्षय आजीखाने, बिज्जू अण्णा प्रधाने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment