लिंगायत समाजाने मतभेद विसरून एक व्हावे : प्रा सुदर्शनराव बिरादार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

लिंगायत समाजाने मतभेद विसरून एक व्हावे : प्रा सुदर्शनराव बिरादार

 लिंगायत समाजाने मतभेद विसरून एक व्हावे : प्रा सुदर्शनराव बिरादार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-लिंगायत महासंघ शाखा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने लिंगायत समाजाची महत्वाची बैठक रविवार दिनांक 26जुलै रोजी ज्येष्ठ नागरिक संघटना हाँल शेळगी सोलापूर येथे संपन्न झाली.याबैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर हे उपस्थित होते.ते समाज बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले समाजाचा विकास करण्यासाठी समाजबांधवांनी मतभेद व मनभेद विसरुन एक झाले पाहिजे.समाजाला नेतृत्व राहिले नाही.धर्मगुरु व समाजातील राजकिय नेत्यांच्या लोकांचा विश्वास कमी कमी होत चालला आहे.अशावेळी लिंगायत समाजांनी कोणाची वाट न पहाता आपणच एकमेकांना समजून घेऊन सहकार्य करावे.मनभेद व मतभेद विसरून तो आपला आहे समजुन एक झाले पाहिजेत.एकमेकांच्या हा दुःखात सहभागी व्हावे. लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढा येथील स्मारक, आगामी जनगणनेत लिंगायत समाजाने काय करायला पाहिजे यावर प्रा बिरादार सर यांनी मार्गदर्शन केले.या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रमणशेट्टी यांनी केले.या बैठकीत कमांडर अशोक आगावणे,हणमंत कोरे,विवेक कोरे,अशोक साखरे, अंबादास बिराजदार, महादेव नागरगोजे, महादेव पाटील,सिद्धारुढ निंबाळे, सोलापुर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.या बैठकीला लिंगायत महासंघाचे सोलापूर शहराध्यक्ष शिवानंद धुत्तरगी, सरचिटणीस मल्लिनाथ जट्टे, लिंगायत महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार,-सुरेश हत्ती, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जट्टे बसवराज काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवलिंगप्पा शाबादे, चौडप्पा भैरामडगी, पंचप्पा मेणसे, यशवंत पाटील नागनाथ जळकोटे भैरप्पा करपे महेश ठेशे सदानंद कलशेट्टी सिद्धाराम कोनापुरे ,सिद्धारूढ निंबाळे सी.जी.बिराजदार , बाबुराव 
, नरोणे बाळासाहेब बिराजदार, चंद्रकांत जट्टे,बसवराज बिडवे, विश्वनाथ कलशेट्टी अंबादास बिराजदार शरणप्पा पारगले-, चंद्रकांत बिराजदार, प्रा सुरेश तानवडे, प्रकाश बिराजदार, अशोक खानापुरे,यांच्यासह
लिंगायत महासंघाचे तुळजापूर,लोहारा धाराशिव, मंगळवेढा,मोहोळ, येथिल असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्व पाहुण्यांचा सत्कार लिंगायत महासंघाचे शहराध्यक्ष शिवानंद धुत्तरगी मल्लिनाथ जट्टे सरचिटणीस, व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रमणशेट्टी यांनी केले.तर सुत्र संचालन अशोक खानापुरे यांनी केले.तर आभार विश्वनाथ कल्याणशेट्टी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages