राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोलापुरात आगमन; जिल्हा प्रशासनाकडून स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोलापुरात आगमन; जिल्हा प्रशासनाकडून स्वागत

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोलापुरात आगमन; जिल्हा प्रशासनाकडून स्वागत




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गुरुवारी सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील तसेच उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे उपस्थित होते.

राज्यपालांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून, प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages