डॉक्टर हे राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत- शितलदेवी मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

डॉक्टर हे राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत- शितलदेवी मोहिते पाटील

 डॉक्टर हे राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत- शितलदेवी मोहिते पाटील





अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्थेच्या मिलेनियम स्कूलच्या वतीने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून अकलूज व परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना शितलदेवी मोहिते पाटील यांनी सांगितले की, समाजाच्या आरोग्यसुरक्षेची जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडणारे डॉक्टर हे प्रत्येक राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. विज्ञानाधिष्ठित वैद्यकीय सेवेद्वारे डॉक्टर केवळ आजारांवर उपचार करत नाहीत, तर समाजामध्ये विश्वास, आश्वासकता आणि जीवनाविषयीची नव्याने उमेद निर्माण करतात.

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला अकलूज परिसरातील डॉ. एम के इनामदार, डॉ.राजीव राणे,डॉ.विद्या एकतपुरे, डॉ. सतीश दोशी, डॉ.निवांत हराळे,डॉ.अभिजीत राजे भोसले, डॉ.संजय सिद्ध,डॉ.निनाद फडे, डॉ. अमोल माने शेंडगे, डॉ.सुरज महाडिक,डॉ.विक्रम गायकवाड,डॉ.शैलेश गायकवाड, डॉ.मानसी इनामदार, डॉ.शिल्पा फडे,डॉ.मोनिका मिसाळ,डॉ.जयंत शिंदे,डॉ. ऋत्विक आर्वे,डॉ.चैतन्य टेके,डॉ.समीर जोशी,डॉ.सुनिल नरुटे,डॉ.विद्या गायकवाड, डॉक्टर सुधीर खंडाळे, डॉ.हेगडे, डॉ.मगर , डॉ.भूषण चंकेश्वरा,डॉ.शिवराज धोत्रे,डॉ.स्मिता धोत्रे, डॉ.युवराज सोलनकर,डॉ.रेवती राणे,प्रिन्सिपल बिनोके पाऊलस. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी व शिवरत्न शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉक्टरांनीही अशा प्रकारच्या उपक्रमातून मिळणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages