पाण्याविना स्मार्ट सिटी कोरडी, अभिनव सामाजिक संस्थेचे निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

पाण्याविना स्मार्ट सिटी कोरडी, अभिनव सामाजिक संस्थेचे निवेदन

 पाण्याविना स्मार्ट सिटी कोरडी, अभिनव सामाजिक संस्थेचे निवेदन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विना पवार मॅडम यांना आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष मीनलताई दास यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 19, दीक्षित नगर भाग चार मधील महिलांसोबत निवेदन देण्यात आले. दी


क्षित नगर भाग चार मध्ये जवळपास 50 ते 60 घरांना नळाचे कनेक्शन नाही त्यामुळे येथील नागरिक शोभा देवी नगर विष्णुनगर या भागातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे असलेल्या नळाचे पाणी दोन रुपये प्रति घागर आणि कधी कधी त्यांच्याकडे जर पाणीपुरवठा कमी झाला असेल तर वीस रुपये प्रमाणे पाणी जार आणून पाणी वापरतात. त्या भागामध्ये पाण्याचे दोन हापसे आहेत त्यातील एक बंद अवस्थेत आहे आणि दुसऱ्या हापश्यातून पण पाणी कमी दाबाने येत त्यामुळे या भागातील नागरिकांची पाण्याची खुप गैरसोय होते या संदर्भात या भागातील नागरिकांनी याआधी झोन कार्यालयाला नवीन कनेक्शन संदर्भात पत्र दिलेले आहेत परंतु प्रशासन या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाही त्यामुळे यांची पाण्याची गैरसोयी थांबेना. त्याचबरोबर दुसरा मोठा प्रश्न म्हणजे या भागातील चेंबर्स हा आहे इथले गोल चेंबर्स आणि प्रॉपर्टी चेंबर्स हे तुडुंब पाण्याने भरून वाहत असतात. रस्त्यातील गोल चेंबरचे पाणी अंगणात आणि पूर्ण रस्त्यावर ती पसरलेले असते त्यामुळे जाता येता या घाण पाण्यातून जावे लागते याची दुर्गंधी येते व गाड्या स्लिप होऊन लोक पडतात छोटे छोटे अपघात सतत होतात तसेच प्रॉपर्टी चेंबर्स आहेत त्यातून पाणी रिवर्स फिरून लोकांच्या घरामध्ये शिरते यामुळे लोकांचे तिथे राहणं खूप कठीण झालेले आहेत येथील चेंबरची वेळोवेळी सफाई केली जात नाही दुरुस्त केले जात नाहीत यामुळे भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दुर्गंधी आणि रोगराई पसरलेली आहे.यासाठी आज निवेदन दिले आहे की ताबडतोब चेंबर दुरुस्त करून द्यावेत व वेळोवेळी चेंबरची सफाई केली जावी आणि जर नागरिकांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब उपाययोजना नाही केल्या तर नागरिकांना घेऊन आंदोलन करू असा इशारा आज देण्यात आला याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मिनलताई दास, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, शहर उपाध्यक्ष अफ्रिन पटेलसुरय्या मणियार, वैशाली कदम, रेखा क्षीरसागर, अनिता भोसले, सुनिता कळशेट्टी, लताबाई पात्रे, जुलेखा काझी, इरफान कंपली, शैहेनज पठाण व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages