पंढरपूरात सायकल दिंडीचा क्रीडा प्राधिकरण संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 13, 2026

पंढरपूरात सायकल दिंडीचा क्रीडा प्राधिकरण संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते शुभारंभ

 पंढरपूरात सायकल दिंडीचा क्रीडा प्राधिकरण संचालक पांडुरंग चाटे यांच्या हस्ते  शुभारंभ



 

         

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

 राज्यासह कर्नाटकातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात विसावली

 सायकल दिंडीने वारकरी परंपरेप्रमाणे केली नगर प्रदक्षिणा

 

 

         पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असूनया सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिंड्या  विविध पालखी सोहळ्यासोबत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी  पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र व कर्नाटकातून चार हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन पार पडले. यावेळी सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला

 

          फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकलिंग हा आरोग्यदायीपर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होतेअसा संदेश या वेळी देण्यात आला.राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पहायला मिळाली.

        यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी हरीष बैजल, यांच्यासह पंढरपूर सायकल्स क्लब व नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी उत्तम प्रकारचे नियोजन केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages