नातेपुते येथील एस एन डी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 11, 2026

नातेपुते येथील एस एन डी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 नातेपुते येथील एस एन डी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात एस.एन.डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नातेपुते च्या विद्यार्थ्यांनी राज्यात व जिल्ह्यात घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व रेणुका पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन जठार यांच्या शुभहस्ते सीबीएसई व आयसीसीच्या मेरिट लिस्टच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात ८ वा आलेला इयत्ता ८ वी मधील विद्यार्थी सुस्मित गावडे, जिल्ह्यामध्ये १३ वा आलेला विद्यार्थी सर्वेश मोहिते, जिल्ह्यामध्ये २३ वी आलेली विद्यार्थिनी श्रुतिका जाधव, तसेच इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी इशिता कुलकर्णी, तेजस्विनी जाधव व वीरा राठोड यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल त्यांचा फेटा हार गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सारिका पालवे, सारिका पानसरे यांचाही सन्मान शाल हार व श्रीफळ देऊन करण्यात आला.यावेळी बोलत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेत शिक्षण दिले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी राज्यात व जिल्ह्यात चांगले यश संपादन केले. शाळा प्रशासन, विद्यार्थी, शिक्षक यांच्या विषयी अभिमान वाटतो. ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली तो उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्व शिक्षक चांगली मेहनत घेत असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याच्या दृष्टीने संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ वेळोवेळी मूलभूत सुविधा पुरवत असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संदीप पानसरे उपमुख्याध्यापक शकूर पटेल फाउंडेशन विभाग प्रमुख शिवानी बर्गे प्राथमिक विभाग प्रमुख नीलम डोंबाळे पी आर ओ मनोज राऊत तसेच शिक्षक शिक्षक तर कर्मचारी व विद्यार्थी  उपस्थित होते.

चौकटीत :
भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी आणि शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा अशी ओळख असणारी शिष्यवृत्ती परीक्षा व त्यासाठी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी अभ्यासक्रमाची अचूक माहिती सराव आणि वेळ व्यवस्थापन शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते हे सिद्ध करून एस. एन. डी. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात व जिल्ह्यात नंबर काढून संस्थेचे नाव लौकिक केले असून विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामागे शाळेतील शिक्षकांचे अथक परिश्रम आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .
                 मालोजीराजे देशमुख
( चेअरमन एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, नातेपुते. )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages