एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 11, 2026

एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

 एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एनबी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएनसी कंपन्यांच्या प्लेसमेंट प्रक्रियेच्या दृष्टीने विशेष प्लेसमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

२९ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना Aptitude आणि Soft Skills या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. नामांकित कॉर्पोरेट ट्रेनर्स यांच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रातील भरती प्रक्रियेनुसार प्रशिक्षण दिले जात आहे. लेखी परीक्षा, तर्कशक्ती, गणितीय क्षमता, इंग्रजी संवाद कौशल्य, गटचर्चा, मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक शिष्टाचार यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरावासह मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करून त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, उद्योगविश्वाच्या अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांची तयारी करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या नेतृत्वाखाली तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. शशिकांत हिप्परगी यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाविद्यालय प्रशासनाने अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आगामी प्लेसमेंट प्रक्रियेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages