अक्कलकोटच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगात; १०८ कोटींचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

अक्कलकोटच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगात; १०८ कोटींचा निधी मंजूर

अक्कलकोटच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम वेगात; १०८ कोटींचा निधी मंजूर

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश; परिसरातील हजारो नागरिकांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा



 अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट मतदारसंघातील नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुमारे १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सध्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बहुभाषिक तालुका म्हणून अक्कलकोटची ओळख आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, वाढती वाहतूक, कृषी बाजारपेठेची वर्दळ तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असून अत्याधुनिक आरोग्य सुविधांची आवश्यकता सातत्याने जाणवत होती.

सध्या कार्यरत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आवश्यक सुविधा पुरविताना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळून १०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

सध्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून, काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट शहरासह तालुका आणि परिसरातील हजारो नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी सोलापूर किंवा अन्य शहरांकडे धाव घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या उपजिल्हा रुग्णालयामुळे अक्कलकोटच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार व तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages