११८ झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी जागा मालकांचा खुलासा; "आम्ही आदेश दिले नव्हते" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

११८ झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी जागा मालकांचा खुलासा; "आम्ही आदेश दिले नव्हते"

 ११८ झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी जागा मालकांचा खुलासा; "आम्ही आदेश दिले नव्हते"



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शहरातील सलगर वस्ती परिसरातील ५४ मीटर रस्त्यालगत असलेल्या ११८ झाडांच्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी जागा मालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांनी महापालिका प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. आम्ही कोणालाही झाडे तोडण्याचे आदेश दिले नव्हते, असा दावा त्यांनी बुधवारी केला.

या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या मूल्यांकनानुसार आणि संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी तब्बल १.२२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच जागा मालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासमोर हजर राहून आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी हजारे आणि पाटील यांनी, "झाडे तोडण्याचे कोणतेही आदेश आम्ही दिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नाही," असे प्रशासनाला सांगितले. मात्र, त्यांच्या दाव्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी विविध बाबींवर उलट प्रश्न उपस्थित करत अधिक माहिती मागितल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणातील अंतिम निर्णय प्रशासनाच्या पुढील चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages