१५ जून 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

१५ जून 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात संपन्न

 १५ जून 'शाळा प्रवेशोत्सव २०२६'  उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेशांचे वितरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेशोत्सव २०२६” कार्यक्रम आज शहरातील विविध मनपा शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.सचिन ओम्बासे यांनी मनपा मराठी मुले शाळा क्र. २८ येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी सोबत प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने उपस्थित होते.तसेच तुळजापूर वेस्ट येथील महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक २ येथे आज स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी उपस्थिती लावली. सोलापूर महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ येथे आज सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या बरोबरच अश्विनी चव्हाण नगरसेविका वनिता पाटील नगरसेविका उपस्थिती होते यावेळी सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांच्या हस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शहरतील विविध मनपा शाळांना नगरसेवक, नगरसेविका यांनी भेट देऊन प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग नोंदविला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त श्रीमती सोनाली यादव,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित आणि सहाय्यक आयुक्त श्रीमती मनीषा मगर महानगरपालिका अधिकारी. या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर सुरेश कासार, संतोष बुलबुले, श्रीमती रजनी राऊळ, निलोपर शेख तसेच अनेक केंद्रीय मुख्याध्यापक यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळा प्रवेशोत्सव उपक्रमात विद्यार्थ्यांची स्वागत वेगवेगळे शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले कुठे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली तर कुठे नवागत विद्यार्थ्यांसाठी खास बग्गी तयार करण्यात आली होती. मनपा शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे मनोगत"शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक बालक शाळेत दाखल होऊन नियमित शिक्षण घेणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालकांनी मनपा शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना नियमित शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे."



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages