श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या उपाध्यक्षपदी राजेशम येमूल यांची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या उपाध्यक्षपदी राजेशम येमूल यांची बिनविरोध निवड

 श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या उपाध्यक्षपदी राजेशम येमूल यांची बिनविरोध निवड


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या उपाध्यक्षपदी राजेशम भूमय्या येमूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक उमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

निवडीनंतर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. लता मिठ्ठाकोल यांनी मावळते उपाध्यक्ष रमेश विडप यांचा सत्कार केला. यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुरंम आणि संचालक डॉ. विजयकुमार अरकाल यांनी विडप यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी, रुग्णसेवेतील तत्परता आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

नूतन उपाध्यक्ष राजेशम येमूल यांनी मनोगत व्यक्त करताना निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पवार, संस्थेचे अध्यक्ष बोल्ली तसेच संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रुग्णसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी डॉ. सचिन बलदवा, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, मनोहर अन्नलदास, रमेश विडप, पार्वतय्या श्रीराम, इरेशम कोंपेल्ली, तज्ज्ञ संचालक डॉ. भारत मुळे, प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन, दुर्गादास येमूल यांच्यासह रुग्णालयातील प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages