३०० बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

३०० बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश

 ३०० बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स, सोलापूर आणि एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा तब्बल ३०० बांधकाम कामगारांनी लाभ घेतला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता भगवान जाधव यांनी केली. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत बांधकाम कामगारांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

शिबिरामध्ये कामगारांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तसेच अन्य विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी कामगारांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले.

यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपत कामगारांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. समाजातील विविध घटकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात पदाधिकारी व सदस्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमासाठी असोसिएशनचे सचिव संतोषकुमार बायस यांच्यासह इफ्तिकार नदाफ, प्रशांत मोरे, गणेश इंदापुरे, मनोज महेंद्रकर, सुनील दूधगुंडी, जवाहर उपासे, नितीन पवार, मनोज बोगा आणि नामदेव म्हेत्रे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनकी यांनी केले, तर आभार गोकुळ चितारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages