नेताजी प्राथमिक व इंग्लिश मिडीयम शाळेत योग दिन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक व इंग्लिश मिडीयम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी योगशिक्षिका कीर्ती बुरा यांनी प्रार्थना,ग्रीव चालनासन, स्कंद खिचाव, स्कंद चक्र, कटि संचालन,गुटना संचालन, ताडासन,वृक्षासन,पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन दंडासन, वज्रासन,वक्रासन,अर्ध अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, उत्तान पादासन,पवन मुक्तासन, सर्व प्रकारचे प्राणायाम, बाराखडीमधील हस्यासन आदी आसनाविषयी माहिती सांगून प्रात्यक्षिके सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, पहिली ते चौथीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने योगासन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जगदेवी रोडगे,प्रशांत बत्तूल,राजश्री कोळी, अर्चना आरकल,सुनीता पवार, वैशाली मोरे,लक्ष्मी नडगिरी, रेणुका दंडवते व सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.

No comments:
Post a Comment