सांगोला आगारास जिजाऊ बस मिळाव्यात शहीद अशोक कामटे संघटनेची मागणी
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने प्रतापजी सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सांगोला आगारास 10 जिजाऊ बस देण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका असून या ठिकाणी एसटी डेपो असून सद्या या डेपोत 58 बसेस असून त्यापैकी लांब पल्यासाठी 14–15, मध्यम पल्यासाठी 16–17 बसेस तसेच ग्रामीण भागासाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी साधारण 25 बसेसची आवश्यकता आहे. परंतु सद्या सांगोला आगारात उपलब्ध असलेल्या 58 बसेसपैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या व कालबाह्य झालेल्या असल्यामुळे वारंवार नादुरुस्त होऊन रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक ग्रामीण फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातून तालुक्याची ठिकाणी येणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांचे सकाळच्या सत्रात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक लांब व मध्यम पल्याच्या बसेस अचानक रद्द करण्याची व उशिरा सोडण्याची वेळ सांगोला डेपोवर येत आहे यामध्ये प्रवाशाची मोठी गैरसोय होत आहे, अनेक वेळा याचा उद्रेक ही होत असून एसटी अधिकारी कर्मचारी व प्रवाशी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस उपलब्ध होत नाहीत परिणामी नवीन मार्ग सुरु होत नाहीत. या भागातील प्रवाशांना पुणे, मुंबई ,हैद्राबाद ,कोल्हापूर अशा अनेक मोठ्या शहराकडे जाण्या–येण्यासाठी बाहेरून येणाऱ्या–जाणाऱ्या बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यातच असलेल्या बसेस जुन्या झालेल्या असल्यामुळे त्या स्क्रॅपसाठी जात आहेत यामुळे सांगोला आगारात प्रवाशांच्या मानाने बसेसची संख्या अंत्यत तोकडी आहे.
तरी या संघटनेच्या निवेदनाद्वारे परिवहन मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येते की, या डेपोतील बसेसची संख्या जुन्या झालेल्या बसेस नादुरुस्त होण्याचे वाढते प्रकार ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता सांगोला आगाराला कमीत कमी तातडीने जिजाऊ दहा नवीन बसेस देण्यात याव्यात जेणेकरून सांगोला डेपोतून प्रवाशांना व विद्यार्थ्यांना चांगली व वेळेवर सेवा देणे सांगोला आगारास सोयीचे होईल.या निवेदनाच्या प्रती महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ मुंबई सेंट्रल कार्यालय यांनाही पाठवण्यात आले आहेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने केली आहे.

No comments:
Post a Comment