लक्ष्मी आनंद विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 22, 2026

लक्ष्मी आनंद विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

लक्ष्मी आनंद विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न



टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पतंजली परिवाराच्या योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पतंजली परिवाराकडून मा. संजय बोराटे साहेब, मा. दिलीप जाधव साहेब, जवाहरलाल लोंढे , तसेच लक्ष्मण शिद , हे योग प्रशिक्षक प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगत विविध योगासने व व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सक्षम राहते, संतुलित आहार, नियमित निद्रा, व्यायामाचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैली याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध योगासनांचा सराव केला.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी योग दिनाचे महत्त्व विशद करणारे आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिव सुरज बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य विकास करळे, पीआरओ खुळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी व सुदृढ जीवन जगण्याचा संकल्प केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages