२५ वर्षे अपघातमुक्त सेवेसाठी सोलापूर एसटीच्या २० चालकांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर विभागातर्फे २५ वर्षे विना अपघात सुरक्षित सेवा बजावणाऱ्या २० चालकांचा त्यांच्या पत्नींसह गौरव करण्यात आला. सुरक्षित व जबाबदार सेवेमुळे एसटीची प्रतिमा उंचावणाऱ्या चालकांच्या कार्याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी होते. सन्मानित चालकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, २५ वर्षे सुरक्षित सेवा बिल्ला तसेच २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात अमोल गोंजारी यांनी एसटीच्या प्रवाशांची सुरक्षितता हीच चालकांची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. तब्बल २५ वर्षे अपघातमुक्त सेवा देणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व सन्मानित चालकांचे अभिनंदन केले. त्यांच्या कार्यामुळे एसटी महामंडळावरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी **यंत्र अभियंता शीतल बिराजदार, कामगार अधिकारी सुतार, विभागीय वाहतूक अधिकारी नखाते, विभागीय लेखा अधिकारी कुलकर्णी, विभागीय सांख्यिकी अधिकारी कौलगे तसेच भांडार अधिकारी मदने-पाटील** यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे सुरक्षित वाहनचालकांना प्रोत्साहन मिळाले असून, अपघातमुक्त सेवेसाठी इतर चालकांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.jpg)
No comments:
Post a Comment