व्हिएतनाम देशातील गारमेंट उद्योजक अत्याधुनिक पद्धतीने गणवेश तयार करतात- अजय रंगरेज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

व्हिएतनाम देशातील गारमेंट उद्योजक अत्याधुनिक पद्धतीने गणवेश तयार करतात- अजय रंगरेज

 व्हिएतनाम देशातील गारमेंट उद्योजक अत्याधुनिक पद्धतीने गणवेश तयार करतात- अजय रंगरेज




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जगातील अग्रगण्य शिवण यंत्र उत्पादक कंपनीच्या जॅक शिलाई मशीन यांनी आयोजित केलेल्या व्हिएतनाम येथील अभ्यास दौऱ्यात गेलेल्या सोलापूर मधील गारमेंट उद्योजकांना तेथील अत्याधुनिक मशिन्स आणि कामाची पद्धत पाहून एकूणच युनिफॉर्म गारमेंटच्या उत्पादन वाढीसाठी येथील अत्याधुनिक पद्धती वापरायला काहीच हरकत नाही असे मत झाले असल्याचे असोसिएटेड गारमेंट क्लस्टर फाउंडेशनचे डायरेक्टर अजय रंगरेज यांनी सांगितले.

13 जून ते 17 जून या कालावधीत व्हिएतनाम मधील हो ची मिन्ह सिटी येथील विशेष गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यातील अनुभव सांगताना पुढे रंगरेज म्हणाले की प्रत्येक कामगार हा व्हिएतनांमध्ये साखळी पद्धतीनेच काम करतो आणि प्रत्येक फॅक्टरी त्याच प्रकारे काम करते म्हणून त्यांचे उत्पादन क्षमता वाढत असताना दिसून येते असे लक्षात आले.

याचे कारण असे आहे की आपल्या सोलापुरात एका कामगाराकडून सलग संपूर्ण पूर्ण युनिफॉर्म बनवून घेतला जातो आणि त्यामुळे उत्पादन खूप कमी प्रमाणात मिळतो. परंतु जर आपण व्हिएतनाम सारखे साखळी पद्धतीमध्ये युनिफॉर गारमेंट तयार करायला सुरुवात केली तर सोलापूरच्या कामगारांची उत्पादन क्षमता 100% ने वाढून मोबदला देखील जास्त मिळेल. या मुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येईल.

 व्हिएतनाम मध्ये प्रत्येक गारमेंट फॅक्टरीची क्षमता प्रचंड आहे. प्रत्येक जण एक एकर पासून 23 एकर पर्यंतच्या क्षेत्रात आपले मशीन्स उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे येथील उत्पादन क्षमता वाढून उलाढाल खूप मोठी होत असल्याचे लक्षात येते.

यावरून गारमेंट उद्योजकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यांनी अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध करून घ्यावे. कामगारांची साखळी पद्धत कशी असते ते शिकून घ्यावे. म्हणजे उत्पादन क्षमता वाढेल. आधुनिक पद्धतीत थोडा खर्च जास्त होईल. परंतु उत्पादन क्षमता वाढल्यामुळे व्यवसाय वाढून आपोआपच उत्पन्न देखील वाढते असे आमच्या टीमचे मत झाले असल्याचे रंगरेज म्हणाले.

या व्हिएतनाम दौऱ्यामुळे सोलापूरच्या युनिफॉर्म उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक दृष्टीने हा अभ्यास दौरा खूप महत्त्वाचा झाला आहे. याचे नियोजन जॅक कंपनीचे अधिकृत विक्रेते कोयना शिलाई मशीन से गणेश सुत्रावे यांच्या विशेष प्रयत्नामुळेच हे शक्य झाले असल्याचे टीमने कृतज्ञता व्यक्त केली.

या अभ्यास दौऱ्यात सोलापूर मधील गारमेंट उद्योगाशी संबंधित प्रमुख उद्योजकांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ व्हिएतनामला गेले आहे. त्यात प्रामुख्याने सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश डाकलिया, खजिनदार श्रीकांत अंबुरे, डायरेक्टर आनंद झाड, सी.एम.ए.आय. वेस्टर्न रिजनचे डायरेक्टर अमित कुमार जैन तसेच अजय रंगरेज यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages