शाळेची पहिली घंटा वाजली; विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने स्वामी विवेकानंद प्रशाला पुन्हा गजबजली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर येथे आज दि. 15/06/2026 रोजी ढोल ताशाच्या गजरात व प्रचंड उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. नरसिंह आसादे ( नगरसेवक, सो. म. पा.) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. हार्दिक निमाणी ( कार्यकारणी सदस्य नॅब ) व प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक देऊन ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल यासाठी महाराष्ट्रात यंदाचा ‘ शाळा प्रवेशोत्सव’ 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे .
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि मुलाला शाळेच्या प्रवाहात आणणे हे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हणमंत नारायणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष माने यांनी केले व आभार मच्छिंद्र सपताळे यांनी केले. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक गणपती कोळी,संजय राठोड, खंडू शिंदे, उज्वला हिंगमिरे, बिराजदार उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment