आ.रोहित पवार यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

आ.रोहित पवार यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा

आ.रोहित पवार यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांना सरसकट कोणतीही अट न घालता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर मध्ये अन्नत्याग आंदोलन उपोषणाला बसणारे आ. रोहित पवार यांना संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने पंढरपूर येथे भेटून पाठिंबाचे पत्र सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.

रविवार पासून पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ जूनपासून पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत 'अन्नत्याग' आंदोलन (उपोष) सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड नेहमीच उभा असून कर्जमाफी नसल्या कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केली आहेत त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी जे उपोषण सुरू केले आहे त्या आंदोलनास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले तालुकाध्यक्ष दीपक कवडे कैलास कणसे  संतोष शिंदे मंगेश माने सुहास  पोळ नागराज लवंड राजू शिंदे मल्हार गायकवाड रोहित गावडे सुदर्शन चौगुले शिवाजी ढवळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages