विजयदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

विजयदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

विजयदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा



अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अकलूज येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी संस्था प्रतिनिधी तसेच दादांचा चाहता वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त शंकरनगर अकलूज येथील, शिवरत्न बंगल्यासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. दादांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी श्री अकलाई देवी मंदिरात जाऊन दर्शन घेत, राज्याच्या व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी दादांना हार-तुरे न आणण्याचे आवाहन मान्य करत विविध प्रकारची झाडे भेट दिली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला. तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, मोहिते पाटील घराण्यातील सर्व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे सदस्य, नगरसेवक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण दिवस कार्यकर्ते, समर्थक आणि शुभेच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सामाजिक उपक्रम, पर्यावरणाचा संदेश आणि जनसंपर्क यांचा संगम घडवून आणणारा हा वाढदिवस सोहळा अकलूज परिसरात चर्चेचा विषय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages