सिव्हिल इंजननियरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

सिव्हिल इंजननियरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 सिव्हिल इंजननियरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

 तीनशे कामगारांचे यशस्वी तपासणी 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर सोलापूर व एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट तर्फे सोलापूर शहरातील बांधकाम कामगारा करिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर  भरवण्यात आले होते.
 यात एकूण 300 कामगारांनी सहभाग घेतला होता.

अशोक चौक येथील पोलीस हेडकॉटर मध्ये भरविण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे उद्घाटन सोलापूरचे आयुक्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  वैशंपायन  मेडिकल कॉलेजचे डीन ऋत्विक जयकर सर आवर्जून उपस्थित होते. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर बी एम जाधव, सचिव संतोषकुमार  बायस यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य  साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर  सोबतच वृक्षारोपणचे कार्यक्रम देखील असोसिएशन च्या वतीने जोमात करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर भगवान जाधव यांनी केले तर आभार गोकुळ चितारी  यांनी मानले तर सूत्रसंचालन कणकी मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजिनिअर इफ्तिकार नदाफ, प्रशांत मोरे, गणेश इंदापुरे, मनोज महेंद्रकर, सुनील दूधगुंडी, जवाहर उपासे, नितीन पवार, बोगासर, मनोज व नामदेव म्हेत्रस यांनी परिश्रम घेतले. यासह असोसिएशनचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages